...तर दुचाकी होईल पोलिसांकडून तीन महिने ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 04:21 PM2020-03-28T16:21:19+5:302020-03-28T16:23:45+5:30

अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एकावेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सुचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत.

... then the bike will be 'locked down' by the police for three months. | ...तर दुचाकी होईल पोलिसांकडून तीन महिने ‘लॉकडाऊन’

...तर दुचाकी होईल पोलिसांकडून तीन महिने ‘लॉकडाऊन’

Next
ठळक मुद्देघरातून दुचाकी काढताना शंभरदा विचार करावा लागेलहुल्लडबाजी थांबणार

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता राज्यासह संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शहरात वारंवार सांगुनही आणि पेट्रोलव्रिकीवर मर्यादा आणूनदेखील दुचाकींचा वापर सर्रास सुरूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ महिन्यांकरिता त्याला दुचाकीला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा फैलाव राज्यात वेगाने होत असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या तीसऱ्या टप्प्यात राज्य आले असून पुढील काही दिवस धोका अधिक वाढणार आहे. यामुळे प्रशासनाकडून युध्दपातळीवर खबरदारी घेतली जात आहे. अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एकावेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सुचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत. तरीदेखील बहुतांश भागात दुचाकींचा वापर कमी होत नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कलम १४४ व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा कलम १८८नुसार विनाकारण घराबाहेर दुचाकीवर आलेल्या नागरिकांच्या दुचाकी थेट पुढील तीन महिन्यांकरिता जप्त करण्याचे फर्मान काढले आहे. रुग्णालयाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांवर अशा पध्दतीची कारवाई होणार नाही; मात्र अगदी घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या भाजीपाला, दुध, किराणा माल खरेदीसाठी दुचाकींवर बाहेर पडणा-या व्यक्तींवरसुध्दा पोलिसांकडून अशा पध्दतीची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जप्त केलेल्या दुचाकी पुढील तीन महिन्यांकरिता शहरांमधील पोलीस ठाण्यात ‘लॉकडाऊन’ केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता दुचाकी घेऊन मिरविणा-यांना घरातून दुचाकी काढताना शंभरदा विचार करावा लागेल.

हुल्लडबाजी थांबणार
शहर व परिसरातील ओस पडलेल्या रस्त्यांवरून दुचाकींद्वारे मिरवित हुल्लडबाजी करत ‘लॉकडाऊन’ स्थितीचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणाºया टारगट दुचाकीस्वारांना यामुळे चाप बसणार आहे. मोबाईल कॅमेºयातून शहरातील ओस पडलेले रस्ते, बंद दुकाने यांचे चित्रीकरण करत बिनबोभाटपणे फिरणाºया दुचाकीस्वारांना अटकाव करण्याकरिता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आता अशा लोकांच्या दुचाकी थेट तीन महिन्यांकरिता जप्त करण्याचे आदेश बंदोबस्तावरील पोलिसांना दिले आहेत.

Web Title: ... then the bike will be 'locked down' by the police for three months.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.