Corona virus : कोरोनाला हरवायचंय... मग हे वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 05:03 PM2020-03-28T17:03:18+5:302020-03-28T17:04:44+5:30

कोरोनाविषयी विषयी अफवा आणि सल्ले, टिकटॉक व्हिडिओ, रॅप सॉन्ग, बरेच काही प्रकार तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील .

Corona virus : you will want to Beat to Corona ... then read this! | Corona virus : कोरोनाला हरवायचंय... मग हे वाचाच!

Corona virus : कोरोनाला हरवायचंय... मग हे वाचाच!

googlenewsNext
ठळक मुद्दे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात

पुणे - कोरोना विषाणू संदर्भात लोकांमध्ये अजूनही बरेच समज-गैरसमज आहेत. कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या माहितीवर लोक सहजपणे विश्वास ठेवत आहेत. त्यास सोशल मीडिया मोठया प्रमाणावर कारणीभूत आहे. त्यावर येणाऱ्या माहितीवर लोक लगेच विश्वास ठेवून कसलीही खातरजमा न करता पुढे पाठवत आहेत. सध्याच्या परिस्थितीत लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात देत आहोत. 

प्रश्न - नोव्हेल कोरोना व्हायरस म्हणजे  काय?
उत्तर - नोव्हेल कोरोना हा एक विषाणू (व्हायरस) आहे, जो सर्वात पहिल्यांदा चीन  देशाच्या वुहान येथे आढळला. याला नोव्हेल म्हणण्यात येते कारण हा विषाणू पहिल्यांदाच आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणा?्या आजाराला 'कोविड १९' हे नाव दिले आहे.

प्रश्न - कोरोना विषाणूचा स्रोत (मूळ) काय आहे?
उत्तर - सध्यातरी या विषाणूच्या संसगार्चा खात्रीशीर स्त्रोत कळालेला नाही. कोरोना विषाणू ही विषाणूंचे एक मोठे कुटुंब आहे,  काहींमुळे लोक आजारी पडतात आणि काही प्राण्यांमध्ये पसरतात. सुरुवातीला चीनच्या वुहान येथे पसरलेल्या या साथीमधील लोकांचा सागरी अन्न आणि प्राणी बाजाराशी संबंध आला होता, अशी नोंद आहे.

प्रश्न - कोविड १९ आजाराची प्राथमिक लक्षणे कोणती आहेत?
उत्तर - आतापर्यंत या आजाराचा रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि श्वासोछ्वास करण्यास होणारा त्रास, अशी आहेत.

प्रश्न - हा विषाणू कसा पसरतो?
उत्तर - हा एक नवा विषाणू असल्यामुळे नेमका कशा-कशामुळे प्रसार होतो हे स्पष्ट नाही. सुरुवातीला कदाचीत प्राण्यापासून पसरलेला हा विषाणू आता व्यक्ती संपकार्तून पसरताना दिसतो आहे. असा तर्क आहे की इतर साथीच्या आजाराप्रमाणे एखादी विषाणू प्रभावित व्यक्ती जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा याचा प्रसार होतो.

प्रश्न - या आजाराला रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे का?
उत्तर - अद्याप नाही. आजपर्यंत, हा विषाणू रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी कोणत्याही लसीचा शोध लागला नाही.

प्रश्न - यावर कोणते उपचार आहेत?
उत्तर - या विषाणूच्या प्रादुभार्वावार सध्यातरी कोणताही उपचार उपलब्ध नाही. लक्षनांनुसार औषधें दिली जातात.

प्रश्न - स्वत:ला सुरक्षित कसे ठेवता येईल?
उत्तर - या विषाणूचा इलाज करण्यासाठी सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही. या विषाणूला शरिरात प्रवेश करू न देणे हा सर्वोत्तम उपचार आहे. तसेच वैयक्तीक स्वच्छतेचे पालन करा, सतत साबणाने हात धुण्याची सवय ठेवा, शिंकताना व खोकताना तोंड झाका, प्रवास करणे टाळा.

प्रश्न - कोरोनाग्रस्त व्यक्तीशी संपर्क आल्यास काय करायला हवे?
उत्तर - संपर्क आल्यापासून किमान १४ दिवस स्वत:ला इतरांपासून विलग ठेवा. आपल्या तब्येतीकडे काटेकोरपणे लक्ष द्या. खालील शारिरीक लक्षणांचे निरिक्षण करा. ताप, खोकला, श्वसनास त्रास किंवा श्वास कमी पडणे.
वरीलपैकी लक्षणे दिसल्यास पुढिल उपचार व सुविधांसाठी जवळच्या आरोग्य सुविधा सेवेशी संपर्क करा. बाधित व्यक्तीशी आलेल्या संपकार्बाबत पूर्ण माहिती द्या.

प्रश्न -  तपासणी कोणी करुन घ्यायला हवी?
उत्तर - जर तुम्हाला ताप, खोकला किंवा श्वासोच्छ्वास करायला त्रास होत असेल, तर तुम्ही लगेच वैद्यकीय मदत घ्यायला हवी. डॉक्टर, तपासणी करुन आणि चीन किंवा इतर कोरोना व्हायरस प्रभावित देशाशी किंवा व्यक्तीशी तुमचा आलेला संपर्क याचा तपशील घेऊन सांगतील की तुम्हाला तपासणीची गरज आहे की नाही.

Web Title: Corona virus : you will want to Beat to Corona ... then read this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.