देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
इच्छुकांनी मागील पाच दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बड्या व वजनदार नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून, पक्षाच्या नगरसेवकांची मने वळविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली. ...
कॉँग्रेस आघाडीसह युतीच्या इच्छुक उमेदवारांचे लक्ष श्रेष्ठींच्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकांकडे लागले असून, कोणती जागा कुणाला सुटणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. ...