vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 01:46 PM2019-09-30T13:46:09+5:302019-09-30T13:46:33+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती खेळी खेळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

vidhan sabha 2019: Vanchit bahujan aghadi's challenged before Congress | vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

vidhan sabha 2019 : ‘वंचित’चे काँग्रेस, राकाँसमोर तगडे आव्हान!

googlenewsNext


- संतोष वानखडे
वाशिम : वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजनाचा धोका असून, परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीत ‘वंचित’ही मतांच्या बाबतीत रिसोड मतदारसंघात दुसऱ्या स्थानी तर वाशिम मतदारसंघात तिसºया स्थानी होती हे विशेष !
गत लोकसभा निवडणूकीत रिसोड विधानसभा मतदारसंघात तर काँग्रेस उमेदवारापेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जास्त मतदान होते.
आता विधानसभा निवडणुकीतही अद्याप वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची तुर्तास तरी चिन्हे दिसत नाहीत. वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा या तिनही मतदारसंघात तयारी केली असून, त्यादृष्टीने वातावरणही तापविले आहे.
वंचित आघाडीने ओबीसी, दलित, मुस्लिम व वंचित घटकातील मतदारांवर लक्ष केंद्रीत केल्याने आणि हाच मतदार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मतदार असल्याने निवडणुकीत मतविभाजनाचा धोका वर्तविला जात आहे.
शिवसेना, भाजपापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या परंपरागत मतपेढीला वंचित बहुजन आघाडीकडून खिंडार पड्ण्याची शक्यता गृहित धरता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती खेळी खेळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर लक्ष!
रिसोड विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला मालेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी रसद पुरविली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकगठ्ठा मतदानाच्या भरवशावर या तालुक्यातून काँग्रेसला मोठे मताधिक्क असते. ही बाब हेरून वंचित आघाडीने राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांंच्या खांद्यावर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची धूरा सोपविली आहे. या मतदासंघात परंपरागत मतपेढीला वंचित आघाडीने सुरूंग लावल्याचे दिसून येते. वाशिम विधानसभा मतदारसंघातही दलित, मुस्लिम, ओबीसी यांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: vidhan sabha 2019: Vanchit bahujan aghadi's challenged before Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.