अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
Nitin Gadkari: सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करावे. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. ...
Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary : पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढेही होत राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंडित नेहरुंना अभिवादन केले ...
CoronaVirus: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. ...