अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
सुषमा स्वराज हिंदुत्ववादी असल्या, तरी कडव्या नव्हत्या. अडवाणींच्या शिष्या असल्या, तरी त्यांचे हिंदुत्व वाजपेयींच्या जवळ जाणारे होते. पुढे मोदींसारख्या लोकप्रिय नेत्यासोबत काम करतानाही त्यांचे वेगळेपण उठून दिसले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ...
अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. ...
सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्यावर केली होती. ...
28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...