अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:26 AM2019-08-05T09:26:52+5:302019-08-05T09:30:18+5:30

अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

Mufti recalls Vajpayee, says 'feeling his absence the most' | अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती 

अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवतेय - मेहबूबा मुफ्ती 

Next
ठळक मुद्देअमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवत असल्याचं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

श्रीनगर - अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यानंतर अब्दुल्ला यांनी राज्यातील जनतेला शांत राहण्याचं आवाहन केलं. तसेच काश्मीरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली आहेत. 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवत असल्याचं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 'भाजपामध्ये असून देखील अटल बिहारी वाजपेयी यांना काश्मिरी जनतेविषयी सहानुभूती होती. त्यांनी काश्मीरमधील जनतेचे प्रेम कमावले होते. आज त्यांची खूप जास्त उणीव जाणवत आहे.' असं ट्वीट मुफ्ती यांनी केलं आहे. 

काश्मीरच्या प्रश्नावर नक्की मोदी सरकारच्या मनात काय चाललंय? याचं उत्तर काही तासांत समजणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 9.30 वाजता आहे. या बैठकीत काश्मीर खोऱ्यातील प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार आहे. 

रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमावेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जात आहे. 

संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लखनपूरपासून काश्मीरच्या घाटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत काश्मीरमध्ये जवानांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली. लवकरच इंटरनेट सेवा खंडित होणार असल्याचं समजतं आहे. संचारबंदीदेखील लागू केली जात आहे. काय होणार आहे, अल्लाह जाणे. एक मोठी रात्र सुरू होत आहे. या कठीण काळात आपण सोबत राहायला हवं आणि जे होईल त्याचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असं मुफ्तींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं. मुफ्तींचं हे ट्विट ओमर अब्दुल्लांनी रिट्विट केलं आहे. 

 

Web Title: Mufti recalls Vajpayee, says 'feeling his absence the most'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.