Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही, असे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले. ...
Sushma Andhare question on Ajit Pawar Plane Crash: सोलापूरच्या सभेत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. बंदी असलेल्या विमानाचा वापर का झाला? असा सवाल करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. ...
राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मुख्य मुद्दा आहे. मी वारंवार विचारतोय कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार आहे. पण दुर्दैवाने त्यावर कुणी बोलत नाही असं तटकरेंनी सांगितले. ...