Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
अजितदादांचे आयुष्य पाहिले तर त्यांच्या जीवनात कायम त्रास भोगावा लागला. त्यांच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. शरद पवारांच्या देखरेखीत ते मोठे झाले असं भुजबळांनी सांगितले. ...
अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला. ...
Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का? ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजित पवार यांच्या निधनानंतर प्रामुख्याने केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावत आहेत. त्यातच आता भुजबळांनी एक विधान केले. ...
Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत आज विदीप जाधव यांच्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ...
सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अतिशय भावूक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, सोशल मीडियावर काही मंडळींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली... ...
Ajit Pawar Death News: विलिनीकरणाचा विषय अजित पवार यांच्या मनात असता तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला होता. त्यावरून आता संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. ...