शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शून्य कचरा मोहिमेला आजपासून प्रारंभ; नियोजनात लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 01:00 IST

केडीएमसीचा गुन्हे दाखल करण्याचा इशारा

कल्याण : केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यात ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले गेले आहे. वर्गीकरण न करणाºया, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. प्लास्टिकबंदी, शालेयस्तरावर ई-वेस्ट गोळा करणे, कॉल आॅन डेब्रिज, कचराकुंडीमुक्त शहर आदी उपक्रमांचे प्रतिसादाअभावी तीनतेरा वाजले असताना शून्य कचरा मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो? याकडे लक्ष लागले आहे.

पश्चिमेतील नागरिकांची आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या त्रासातून सुटका करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. एप्रिल २०१८ मध्ये वर्गीकरण न केल्यास कचरा न उचलण्याचा तसेच आस्थापना व गृहनिर्माण सोसायट्यांवर दंड आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र, नियोजनच नसल्यामुळे ती मोहीम बारगळली होती. राज्य सरकारची प्लास्टिक बंदी, कॉल आॅन डेब्रिज या योजनाही बासनात गुंडाळाव्या लागल्या. आता पुन्हा शून्य कचरा मोहीम पालिकेतर्फे सोमवारपासून राबविली जाणार आहे.

महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. कोकरे स्वत: गृहसंकुल आणि वसाहतींमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहेत. यामध्ये आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता मार्शल यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांची मानसिकता यावर या शून्य कचरा मोहिमेचे यश अवलंबून आहे.

ओला कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये नको

च्ओला कचरा हा स्वतंत्र डस्टबिनमध्ये ठेवून तो देण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत तो प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधला जाणार नाही अथवा त्यामध्ये प्लास्टिक, कागद आणि अन्य कचºयाचे घटक राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.च्ओला कचरा दररोज उचलण्यात येणार आहे, तर सुका कचरा घरात साठवून अथवा सोसायटीत वेगवेगळ्या गोण्या अथवा डब्यांमध्ये साठवून घंटागाडीमध्ये देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुका कचरा बुधवारी आणि रविवारी स्वीकारण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका