शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

"वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन्...", ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: July 12, 2024 22:13 IST

मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले.

ठाणे : मुंबईतील कावेरी नाखवा कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाखवा यांना चिरडणाऱ्या मिहीर शहाला फाशी द्या आदी मागण्यांंसाठी ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना  महिला आघाडीतील रणरागिणीनी आज सायंकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले.

या महिला आघाडीच्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळानेमागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले. या आंदोलनात जिल्हा संघटक रेखा मोहन खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, उप जिल्हा संघटक अॅड. आकांक्षा  राणे, संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, शहर संघटक प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, पुष्पलता भानुशाली,  विद्या कदम, राजेश्री सुर्वे, स्नेहा पगारे, उषा बोरुडे, वैशाली मोरे, विभाग समन्वयक नीलिमा शिंदे, उप शहर संघटक अनिता प्रभू, ज्योती दुग्गल, सुप्रिया गावकर तसेच इतर शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.

वरळीमध्ये भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा या महिलेला चिरडण्यात आले. आरोपी मिहीर शहा हा शिंदे गटाचे पालघरचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल ६० तासानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांनवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यास विलंब लावून मोठे षडयंत्र रचले आदी आरोप या आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी केले .

 मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराला तात्काळ पकडू शकतात तर या मुजोर मिहीर शहाला पकडण्याकरिता तीन दिवस का लागले ? यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्याचा दबाव होता ? हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे. मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळी मधील कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का ? असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी यावेळी केला.

शहांच्या अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करा.- गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये व हा खटला फास्ट ट्रॅक वरती चालवून मानवरुपी राक्षस प्रवृत्तीच्या मिहीर शहाला फाशीच झाली पाहिजे. तसेच शहा कुटुंबीयांच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीने आपल्या निवेदनात केली आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेagitationआंदोलनAccidentअपघात