शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अभियंता दिनी भिवंडीतील रस्ते बनविणारे अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 18:01 IST

Engineer's Day And Bhiwandi Potholes : वंडी शहरातील मनपा व टोल प्रशासनकडे अशा रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर धारेवर धरत ट्रॉल केले.

नितिन पंडीत 

भिवंडी - आज जागतिक अभियंता दिन असल्याने सोशल मीडियावरून जगभरातील सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र भिवंडी शहरातील मनपा व टोल प्रशासनकडे अशा सर्वच रस्त्यांची सध्या अत्यंत दुरावस्था झाल्याने भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून भिवंडीतील रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरत ट्रॉल केले आहे. भिवंडीतील रस्ते बनविणारे इंजिनियर सोडून बाकी सर्वांना जागतिक अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा आशयाच्या शुभेच्छा अनेक भिवंडीकरांच्या  व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स बरोबरच  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आज दिवसभर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. 

भिवंडी शहरातील सर्वच रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून येथील उड्डाणपुलांवर देखील मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तर भिवंडीत असलेल्या कशेळी अंजूरफाटा, माणकोली चिंचोटी, भिवंडी वाडा, भिवंडी कल्याण, मुंबई नाशिक महामार्ग या सर्वच टोल रस्त्यांवर देखील मोठ्याप्रमाणात खाद्याचे साम्राज्य पसरल्याने भिवंडीकरांना खड्ड्यांचा व रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने हे रस्ते बनविणारे अभियंते नेमकी काय पद्धतीने व गुणवत्तेने येथील रस्ते बनवितात असा सवाल उपस्थित करीत भिवंडीकरांनी आज जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून येथील खड्डेमय रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोडून इतर सर्व अभियंत्यांना जागतिक अभियंता दिनाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. भिवंडीकरांच्या या अनोख्या शुभेच्छा मनपा प्रशासनातील अभियंत्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्या असाव्या एवढे मात्र नक्की.    

टॅग्स :bhiwandiभिवंडीPotholeखड्डे