शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे अर्धे युद्ध जिंकले, सर्व्हे केलेल्या १९.४८ लाख ठाणेकरांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:13 IST

या अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता ९ ऑक्टोबर रोजी झाली. पहिल्या पंधरवड्यात केलेल्या सर्व्हेमध्ये महापालिकेने रोज सरासरी ८० ते ९० हजार लोकांचा सर्व्हे केला. (Corona test)

ठाणे :ठाणे महानगरपालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १९ लाख ४८ हजार १०२ जणांचा सर्व्हे करण्याचे धनुष्य पेलण्याचे काम केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केलेल्या या कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत आणले जाणार आहे.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता ९ ऑक्टोबर रोजी झाली. पहिल्या पंधरवड्यात केलेल्या सर्व्हेमध्ये महापालिकेने रोज सरासरी ८० ते ९० हजार लोकांचा सर्व्हे केला. सात लाख सात हजार ९४६ कुटुंबांचा सर्व्हे करून या कुटुंबातील १९ लाख ४८ हजार १०२ जणांच्या पालिकेकडे नोंदी करून घेतल्या. यासाठी रोज ५००-५५० जणांचे पथक हे लोकांच्या घरोघरी जाऊन हे काम करीत होते. यात भेटी दिलेल्या कुटुंबीयांची पूर्ण माहिती नोंद करून घेतली असून आता दुसऱ्या टप्प्यात अगोदर भेटी दिलेल्या कुटुंबांना भेटून त्यांच्या कुटुंबातील आजारी माणसांची माहिती घेतली जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यात भेटी दिलेल्या व्यक्तींना भेटून १५ दिवसांत त्यांच्या घरात कोणी आजारी पडले आहे का, अथवा कोणाला काही लक्षणे आढळली आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. तसे कोणी आढळल्यास त्याला आवश्यक ती मदत केली जाणार आहे. या कुटुंबातील सगळ्यांची नोंदणी झाल्याने त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, पुढील फॉलोअप करणे सोपे जाणार आहे. 

गुरुवारपासून दुसरा टप्पा -गुरुवार, १५ ऑक्टोबरपासून ठाण्यात ‌‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा १५ दिवसांचा असणार आहे. दरम्यान, पहिल्या सर्व्हेत आढळलेल्या कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरसुद्धा रुग्णांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या १५ दिवसांच्या काळात महापालिकेच्या पथकांनी ६० हजारांहून अधिक इतर आजारांचे रुग्ण शोधून त्यांनाही आवश्यक ते सल्ले देऊन मदत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेdocterडॉक्टर