शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिकेत अमराठी महापौर होणार? नवीन की अनुभवी.. कुणाला संधी?

By धीरज परब | Updated: January 23, 2026 11:09 IST

यंदा ५१ महिला निवडून आल्या. त्यात ४२ नगरसेविका भाजपतून, ६ काँग्रेसमधून, तर ३ शिंदेसेनेच्या आहेत.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा-भाईंदर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्याने अनेकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पदासाठी सलग ५ वेळा निवडून आलेल्या अनिता पाटील यांच्यासह अनेक जुन्या व नव्या महिलांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, शहरातील राजकीय समीकरणे, आरक्षण नसल्याने भाजप यंदा अमराठी महापौर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

इथे यंदा ५१ महिला निवडून आल्या. त्यात ४२ नगरसेविका भाजपतून, ६ काँग्रेसमधून, तर ३ शिंदेसेनेच्या आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचा होणार यात शंका नाही. मोठ्या यशानंतर भाजपतून माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास, ध्रुवकिशोर पाटील, प्रशांत दळवी, मदन सिंग, दिनेश जैन, सुरेश खंडेलवाल, अनिल विराणी, मुन्ना सिंहपासून अनेकांची नावे महापौरपदासाठी चर्चेत होती. मात्र, आरक्षणामुळे त्यांची संधी गेली. 

भाजपच्या माजी जिल्हा महिलाध्यक्ष अनिता पाटील या सर्वांत ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांचा विचार होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय वंदना पाटील, नयना म्हात्रे, शानू गोहिल, स्नेहा पांडेय, दीप्ती भट, सुनीता जैन, वर्षा भानुशाली, नीला सोन्स, सीमा शाह, वंदना भावसार आदी अनेक नगरसेविकांची नावे शर्यतीत आहेत. 

यांना पुन्हा संधी मिळणार का?

२०१७ साली भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी त्यांची भावजय डिंपल मेहता यांना महापौरपदाची संधी दिली होती. सन २०१९मध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणातून ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे यांची महापौरपदी वर्णी लागली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देणार की, नवीन चेहऱ्यापैकी  कोणाला संधी दिली जाणार की,  ज्येष्ठांचा विचार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira-Bhayandar: Non-Marathi Mayor Possible? New or Experienced Candidate?

Web Summary : Mira-Bhayandar may see a non-Marathi mayor due to new reservations. Senior corporator Anita Patil and others are contenders. BJP's majority makes their candidate likely, with speculation on whether a fresh face or veteran will be chosen.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Mayorमहापौर