शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा शहरामध्ये सर्रास वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:07 IST

महावितरणचे दुर्लक्ष : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचेकारवाईसाठी पत्र, संरक्षण देण्यास तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील अनेक परिसरात सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. काही टोळ्या यामध्ये सक्रिय असून महिन्याकाठी प्रत्येक घरापाठी ३०० ते ४०० रुपये घेऊन चोरीची वीज पुरवली जाते. महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असून पूर्वेकडील संतोष भवन, श्रीराम नगर, वालईपाडा व इतर विभागात महावितरणची वीजचोरी होत असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी वसईच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून कारवाई करण्यास सुचवले आहे.वीजचोरीवर नियंत्रण यावे, यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि लाईनमन यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वीजचोरी पकडली किंवा केली म्हणून पोलीस ठाण्यात तक्र ार देऊन गुन्हा दाखल करतात. पण विजेची चोरी होऊ नये म्हणून कडक पावले उचलली पाहिजेत, असेही पत्रात नमूद केले आहे.संतोष भवन परिसरातील तांडापाडा येथे ५ आॅगस्टला राजेश यादव (३७) याच्या डोक्यावर विद्युत तार पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये व उपाययोजना करण्यासाठी तसेच परिसरातील विद्युत खांबांवरील लोंबकळणाऱ्या व धोकादायक वीज तारांचा सर्व्हे करून त्या वीजतारा बदली करून खांबांचीही दुरुस्ती करावी म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्रसिंग चव्हाण यांना १८ सप्टेंबला सकाळी भेट घेऊन पत्र दिले आहे. वीजचोरीबाबत कारवाई करायची असेल तर पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येईल, असाही उल्लेख या पत्रात त्यांनी केला आहे.नालासोपारा पूर्वेकडील वीजचोरी आणि गलथान कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला असल्याचे तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी लोकमतला सांगितले आहे. ज्या परिसरात वीजचोरी होते, त्या विभागातील बीट अधिकाºयाला मेमोसुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत नालासोपारा शहरात कोणत्याही अत्यावश्यक सुविधा झाल्या नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.