शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी देताना पाटील, पवारांनी पैसे घेतले

By admin | Updated: October 15, 2015 01:42 IST

केडीएमसीच्या निवडणुकीत तिकीटवाटप करताना खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे

कल्याण : केडीएमसीच्या निवडणुकीत तिकीटवाटप करताना खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या नाराजांनी येथील केडीएमसी मुख्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.बंडखोरीच्या भीतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भाजपानेही उमेदवारांची यादी जाहीर केली. यात उमेदवारी न मिळालेल्या काही इच्छुकांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. यास त्यांनी स्थानिक नेतृत्वाला जबाबदार धरून शिवसेनेशी हातमिळवणी करून पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर केला आहे. स्थानिक नेतृत्वाने आमच्याकडून सदस्य नोंदणी याचबरोबर अनेक कार्यक्रम राबवून घेतले. मात्र, उमेदवारी जाहीर करताना बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिले. बाहेरच्यांना तिकिटे दिली जाणार होती, तर सर्व्हेचा देखावा का केला, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जरी प्रामाणिक असले तरी त्यांच्या नावाखाली खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांनी तिकीटवाटप करताना घोडेबाजार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षात ६२५ जण इच्छुक होते. त्यामुळे सर्वांचेच समाधान होऊ शकत नाही.तिकीटवाटप मी आणि पाटील यांनी केलेले नाही. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी सर्व्हेच्या आधारावर उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात तथ्य नाही.