शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोतडी कधी उघडणार : राज ठाकरेंचे तेच गुऱ्हाळ

By admin | Updated: October 26, 2015 00:39 IST

केडीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणातही सभा घेतली. त्यात त्यांनी डोंबिवलीत जे मुद्दे मांडले, तेच मांडल्याने एकंदरीतच त्यांच्या पोतडीतही फारसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले.

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याणातही सभा घेतली. त्यात त्यांनी डोंबिवलीत जे मुद्दे मांडले, तेच मांडल्याने एकंदरीतच त्यांच्या पोतडीतही फारसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी येण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास डगमगवू नका, मी येतोच आहे. माझी पोतडी अजून उघडलेली नाही, असे आश्वस्त केले होते. परंतु, गेल्या दोनही सभांंमध्ये त्यांनी भाजपाचे पॅकेज आणि रविवारच्या सभेत दसरा मेळावा, शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दाखले देत काहीशी वेळ मारून नेली. पण, पोतडी मात्र उघडली नाही. जे दोन दिवसांपूर्वीच झाले, त्याचा केवळ समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचे पॅकेज, त्यांचे वजन यासंदर्भात टीका करणे, हे केले. तसेच दसरा मेळाव्यासंदर्भात विचारांचे सोने लुटा, याबाबतही त्यांनी पुन्हा उल्लेख केला. याखेरीज, केवळ सहन होत नसेल तर शिवसेना सत्तेतून बाहेर का पडत नाही, हा एकमेव मुद्दा त्यातल्या त्यात वेगळा होता. याखेरीज, केडीएमसीतील २० वर्षांची सत्ता, सत्ताधाऱ्यांचे टेंडर, टक्केवारी हे मुद्दे जे दोन दिवसांपूर्वी ते डोंबिवलीत बोलले, तेच बोलले. एक पिढी सत्ताधाऱ्यांनी वाया घालवली, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे रविवारच्या भाषणात नवीन असे काहीही नव्हते. केडीएमसीतील नागरिकांना मनसेने नाशिकमध्ये काय केले, हे नको आहे. त्यांनी निवडून दिलेल्या २७ नगरसेवकांनी काय केले, यासंदर्भातची पोलखोल करावी. पत्रकार परिषदेत त्यांनीच ५० टक्के नगरसेवकांनी उल्लेखनीय काम केले नसल्याचे म्हटले होते. त्यांच्याबाबतीत काय केले जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे जरी त्यांनी म्हटले या महापालिकेतील सत्तेला ते का चिकटून राहिले. असाही प्रश्न आहे.