शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पासाठी मेणाचा महाल

By admin | Updated: September 25, 2015 02:11 IST

कोलबाडच्या राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आगळा वेगळा काल्पनिक आणि पर्यावरणस्नेही मधुज अर्थात मेणाचा महाल साकारला आहे.

ठाणे : कोलबाडच्या राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आगळा वेगळा काल्पनिक आणि पर्यावरणस्नेही मधुज अर्थात मेणाचा महाल साकारला आहे. तो साकारताना स्थानिक महिलांना मेणबत्त्या कशा बनवाव्या याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे त्यांना भविष्यात लघु उद्योग सुरू करण्याची संधीही मिळणार आहे. या मेणाच्या मखराची उंची १५ फूट असून लांबी २२ मीटर व रुंदी ३५ मीटर आहे. गणपतीची मूर्ती शाडूची असून ४ फुटाची आहे. ती कळवा येथील मूर्तीकार दीपक गोरे यांनी तयार केली आहे. हा महाल बनवितांना जवळपास ६०० किलो मेण वितळवून त्यात विविध रंग मिसळून आरास केली आहे . ती करताना त्यात शिंपले ,छोटे मोदक- मोठे मोदक , गुलाबाची फुले , जास्वंदीची फुले , विविध रूपातील गणपती यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांची आकर्षक अशी मांडणी केली आहे. आरास करण्यासाठी एक महिना आधीपासूनच तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले. मंडळाच्या २००-२५० कार्यकर्ते आणि परिसरातील १०० महिलांनी एका महिन्याच्या कालावधीत आरास बनविण्यासाठी सव्वा लाख रुपये खर्च केल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. बाप्पाच्या विसर्जनानंतर या सजावटीमध्ये वापरलेल्या मेणबत्याचे आदिवासी पाड्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण सजावट करणाऱ््या या मंडळाला विविध स्पर्धेत ८० पारितोषिके मिळाली आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विनय राजभर आणि मंडळाचे सल्लागार राजू मोरे यांनी दिली.त्यामुळे ही आगळी वेगळी आरास बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांची गर्दी होत आहे. (प्रतिनिधी)