भिवंडीत गोदाम इमारत कोसळली ; आठ ते दहा कामगार अडकल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 11:44 IST2021-02-01T11:43:48+5:302021-02-01T11:44:27+5:30
एनडीआरएफ पथकाला देखील मदतीसाठी आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे.

भिवंडीत गोदाम इमारत कोसळली ; आठ ते दहा कामगार अडकल्याची शक्यता
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतांनाच दापोडा ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या इमारतीत सुमारे आठ ते दहा कामगार अडकले असल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवांनासह, भिवंडी व ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाथ पथक मदतीसाठी रवाना झाले आहेत. तसेच एनडीआरएफ पथकाला देखील मदतीसाठी आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे.
दापोडा ग्राम पंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कंपाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात एका कुरियर कंपनीचे काम चालत असल्याची माहिती मिळत असून. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कामाचा दिवस असल्याने या गोदामात व कुरियर कंपनीत कामासाठी मजूर गेले होते. काम सुरु असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली ज्यात आठ ते दहा कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून इमारत पूर्णतः कोसळली असल्याने कामगारांना वाचविण्यासाठी बचाव पथका कडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.