शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मतदार १२ लाखांवर

By admin | Updated: December 25, 2016 04:35 IST

ठाणे पालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. जानेवारी २०१७ पर्यंत वयाची

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. जानेवारी २०१७ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचाही या यादीत समावेश करण्यात येत असल्याने हा आकडा ७० हजारांनी वाढण्याचा अंदाज पालिकेने बांधला आहे. निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीत सध्या तरी ११ लाख ४८ हजार मतदारांची नोंदणी असली, तरी हा आकडा १२ लाखांची संख्या पार करेण्याची चिन्हे आहेत. पालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.ठाणे पालिका निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील मतदारांची प्रारूप मतदारयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने पालिकेच्या निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. दुसरीकडे नव्या प्रभागरचनेनंतर ३३ प्रभागांमध्ये १३१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या पहिल्या प्रारूप यादीमध्ये ११ लाख ४८ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, तीच विधानसभानिहाय असलेली यादी महापालिकेने प्रभागनिहाय प्रसिद्ध केली आहे. येत्या ५ जानेवारी २०१७ पर्यंत पुरवणी यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता असून त्यांनतर तीन ते चार दिवसांनी पालिका क्षेत्रातील अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.दुसरीकडे महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी महापालिका क्षेत्रामधील लोकसंख्या ही १२ लाख ६५ हजार ५५१ एवढी होती. मतदारसंख्या ९ लाख ९ हजार ५७३ एवढी होती. २०१२ च्या निवडणुकीमध्ये १८ लाखांच्यावर लोकसंख्या असून ११ लाख ९४ हजार ८३६ इतकी मतदार संख्या होती.