शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा दारूबंदीसाठी आवाज

By admin | Updated: October 12, 2015 04:41 IST

सक्षम ग्रामपंचायतीचा गवगवा करणारे पुढारी किन्हवली परिसरात दारूबंदीसाठी वारंवार दुतोंडी भूमिका बजावत असल्याने नारायणगाव आणि मळेगाव या गावातील महिलांनी गावठी

किन्हवली : सक्षम ग्रामपंचायतीचा गवगवा करणारे पुढारी किन्हवली परिसरात दारूबंदीसाठी वारंवार दुतोंडी भूमिका बजावत असल्याने नारायणगाव आणि मळेगाव या गावातील महिलांनी गावठी दारूच्या बंदीसाठी आवाज उठविला असून या मेळाव्याला १२ बचत गटांसह १३५ महिलांनी सहभाग नोंदविला. दारूबंदीच्या या मेळाव्याला गावातील सरपंच, उपसरपंच मोठ्या मुश्किलीने हजर राहिल्याचे महिलांचे म्हणणे आहे. गावचे पोलीस पाटील उपस्थित होते, मात्र निमंत्रणपत्र देऊन पोलीस प्रशासन गैरहजर राहिले. त्यामुळे गावातील महिलांसह ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मळेगाव व नारायणगाव येथील महिलांनी ग्रामसभेत वारंवार प्रोसिडिंगला नोंद करूनही संबंधित पंचायत काणाडोळा करत असल्याचे महिलांनी सांगितले. अखेर, तक्र ारी करूनही गावठी दारू बंद न झाल्याने महिलांनीच सभा बोलवून दारूबंदीसाठी हा मेळावा घेतल्याची माहिती विलास शिर्के यांनी दिली.या मेळाव्यात महिलांतर्फे ६ ठराव करण्यात आले. त्यात दोन्ही गावांतील दारूबंदी करणे, कोणीही व्यक्ती दारूपार्सल घेऊन आल्यास एक हजार रुपये दंड, दारू पकडून देणाऱ्यास ५०० रु . इनाम, सार्वजनिक कार्यक्र मात कोणतीही व्यक्ती दारू पिऊन आल्यास कायदेशीर कारवाई करणे, धार्मिक सणाच्या दिवशी मच्छी, मटण यांची दुकाने बंद राहतील, आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)