शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील पोई आणि रोहन अंताडे ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुक; चवरे, दहागाव सरपंच पदासाठी चुरशीची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 19:01 IST

कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत असून या चार पैकी पोई व रोहन अंताडे ग्रामपंचतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

टिटवाळा: कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत असून या चार पैकी पोई व रोहन अंताडे ग्रामपंचतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर दहागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच चवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन उमेदवार निवडणूक रिगणात असल्याने येथे सरळ समळ लढत होणार आहे. 

 या चार ही ग्रामपंचायतींच्या सरपंचाच्या निवडणुका प्रथमच थेट जनतेतून होणार आहेत. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकी पैकी पोई ग्रामपंचयतीच्या सरपंच पदी दिपा दिलीप बुटेरे यांची गावांतून बिनविरोध निवड झाली आहे.

या पंचायती मधील पाच सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच रोहन अंताडे ग्रापंचायतीच्या सरपंच पदी सखाराम रोहणे यांची व सात सदस्यांची  बिनविरोध निवड झाली आहे. कल्याण तालुक्यातील दोन सरपंच पदासाठी व चार सदस्यांसाठी 31 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणgram panchayatग्राम पंचायत