उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना

By सदानंद नाईक | Updated: November 6, 2024 19:25 IST2024-11-06T19:25:18+5:302024-11-06T19:25:47+5:30

याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले.

Ulhasnagar BJP District President and Legislative Assembly Speaker clashed for the chair, the dispute in BJP is endless | उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना

उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष खुर्चीसाठी भिडले, भाजपातील वाद संपता संपेना

उल्हासनगर : महायुतीच्या नेत्याच्या पत्रकार परिषदे वेळी खुर्चीवर बसण्यावरून भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यात खुर्चीवर बसण्यावरून तू तू मै मै झाली. याप्रकाराने भाजपातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले.

 उल्हासनगर भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी भाजप मेळाव्यात मुख्यमंत्री यांच्या बाबत काढलेल्या अपशब्दवरून भाजप शिंदेसेनेत जंपली जुमपली होती. अखेर दोघांतील वाद संपुष्टात आल्याचे दोन्ही नेत्याकडून पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले. मात्र त्यावेळी गोपाळ लांडगे, कुमार आयलानी हे पत्रकार परिषद घेत असताना शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व विधानसभा अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यात तू तू मै झाली. त्यावेळी भाजप नेते नरेंद्र राजांनी यांच्यासह अन्य नेत्यांनी रामचंदानी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नाराज झालेले रामचंदानी यांनी पत्रकार परिषद मधून काढता पाय घेऊन दुसरीकडे बसने पसंद केले. या नाराजी नाट्यामुळे भाजपातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Ulhasnagar BJP District President and Legislative Assembly Speaker clashed for the chair, the dispute in BJP is endless