नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचा चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेले दोघेही पावणे गाव येथील राहणारे आहेत.एप्रिल महिन्यात पावणे गाव येथील एॅमसेन टेक या गोडावूनमध्ये घरफोडी झाली होती. दोन अज्ञात व्यक्तींनी गोडावूनच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश मिळवला होता व विविध कंपन्यांचे एल.ई.डी. टीव्ही चोरुन नेले होते. या प्रकारात सुमारे ५ लाख २४ हजार रुपये किमतीच्या घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता गोडावून मधील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र तेथील दोनपैकी एका कॅमेऱ्याची वायर कापण्यात आली असल्याने पोलिसांना तपासासाठी आवश्यक अशी माहिती मिळाली नव्हती. स्वरुपचंद उर्फ अमन पाचुराम रजक (२८) आणि धनजी तिवारी (२७) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही पावणे गाव येथील राहणारे असल्याने त्यांना गोडावूनबद्दल माहिती असल्याने त्यांनी तेथे घरफोडी केली होती. या दोघांकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४ एल.ई.डी. टीव्ही जप्त करण्यात आले आहेत. या दोघांवर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गोडाऊनमधील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक
By admin | Updated: July 7, 2014 01:44 IST
घरफोडी प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचा चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे
गोडाऊनमधील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}