शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे फरारी आरोपी मुंब्य्रातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:40 IST

नवी मुंबईतील तुर्भे, पनवेल शहर, पनवेल तालुका आणि पालघर जिल्हयातील कासा भागातील मोकाट जनावरांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केल्यानंतर त्यांची कत्तलीसाठी चोरी करणा-या टोळीतील असिफ कुरेशी आणि मोसिन कुरेशी या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मुंब्रा येथून नुकतीच अटक केली आहे. त्यांच्या अन्य साथीदारांना यापूर्वीच अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे ठाणे मालमत्ता गुन्हे शाखेची कारवाईमोकाट जनावरांना भूलीच्या इंजेक्शनाने बेशुद्ध केले जायचे नवी मुंबई पोलिसांच्या दिले ताब्यात

ठाणे : कत्तलीसाठी जनावरांची चोरी करणा-या टोळीतील फरारी आरोपी असिफ ऊर्फ मुन्ना कुरेशी (२९, रा. रशीद कम्पाउंड, मुंब्रा, ठाणे) आणि मोसिन ऊर्फ फिन्ना पिदा कुरेशी (२३, रा. कौसा, ठाणे) या दोघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले. या दोघांनाही आता नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.तुर्भे, पनवेल शहर, पनवेल तालुका आणि कासा, पालघर या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात जनावरे चोरणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी टेम्पोवरील चालकांना जादा भाडे देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून टेम्पो भाड्याने घेते. तसेच त्यावरील चालकाला भाड्याबाबत दिशाभूल करून त्यास रस्त्यावर उतरवून देत असल्याची माहिती जमादार श्यामराव कदम यांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली यांच्या पथकाने मुंब्रा भागातून असिफ आणि मोसिन या दोघांनाही १४ सप्टेंबर रोजी अटक केली. रस्त्यावर बसलेल्या जनावरांना भूलचे इलेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केल्यानंतर टेम्पोमध्ये टाकून त्यांची ते चोरी करायचे. याच जनावरांची विनापरवाना वाहतूक करून ती कत्तल करण्यासाठी विक्री करीत असल्याचेही चौकशीमध्ये उघड झाले आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील तुर्भे, पनवेल, पनवेल तालुका, खांदेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यांमध्ये चोरीसह पशुसंरक्षण कलम ११ नुसार प्राण्यांच्या परिवहन कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील काही आरोपींना यापूर्वीच संबंधित पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे हे दोघे साथीदार मात्र गेल्या काही दिवसांपासून पसार झाले होते. ते मुंब्रा भागात वास्तव्य करीत असल्याची माहिती जमादार कदम यांना मिळाली होती. याच माहितीची खातरजमा करून ठाणे मालमत्ता शोध कक्षाच्या पथकाने त्यांना अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी