मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ ट्रकला आग; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:29 IST2019-01-31T23:26:19+5:302019-01-31T23:29:38+5:30
वाहतूक पोलीस घटनास्थळी; एकेरी मार्गानं वाहतूक सुरू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ ट्रकला आग; एकाचा मृत्यू
मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळच्या नांदगावच्या हद्दीत सतिमाता आणि सवेरा हॉटेल दरम्यान अपघात होऊन ट्रकला आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू आहे. अपघात झालेल्या ट्रकमध्ये गॅस सिलिंडर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. मनोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक एकेरी मार्गाने वळवण्यात आली आहे.