शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Updated: September 29, 2015 01:09 IST

बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला.

मोखाडा : बेहटवाडी या गावातील सोन्या राघो घाटाळ (५५) यांचा शनिवारी (२६ सप्टेंबर) सर्पदंशाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला. परंतु, आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे या आदिवासीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचे नातेवाईक रामदास बरफ यांच्याकडून केला जात आहे.सोन्या राघो घाटाळ यांना सर्पदंश झाल्याने दुपारी उपचारासाठी आरोग्य पथक आडोशी या ठिकाणी नेण्यात आले होते. परंतु, तेथे सर्पदंशाच्या इलाजावर कोणती उपचार व्यवस्था नसल्याने तसेच येथील रुग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहनांची व्यवस्था करून खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, येथे डॉक्टरांकडून या पेशंटवर प्रभावीपणे उपचार करण्यात आले नाही. फक्त सलाइन लावून काम भागवले, असा आरोप मृताच्या नातेवाइकांकडून केला जातो.सर्पदंश झाल्यानंतर पेशंटची रक्त तपासणी म्हणजे बीटीसीटी केली जाते. यावरून, सर्प विषारी आहे की अविषारी, याची खात्री पटते. या दरम्यान लगेचच सर्पदंशावर असरदार असणारा एएसव्हीचा टेस्ट डोस दिला जातो. परंतु, यामध्ये उशीर झाल्यास किंवा डॉक्टरांकडून दुर्लक्ष झाल्यास मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.यात धक्कादायक बाब म्हणजे उशीर झाल्यानंतर तसेच पेशंटची तब्येत खालावत असताना पुढील उपचारासाठी हलवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वेळी येथील रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला. यापुढे पैशांची चणचण भासणाऱ्या या आदिवासींची मोठी धावपळ उडाली आणि खाजगी गाडीची शोधाशोध करत असताना तसेच पुढील उपचारासाठी नेताना लगेचच सोन्या घाटाळ या आदिवासीचा मृत्यू झाला. यामुळे या मृत्यूला जबाबदार डॉक्टर की आरोग्य विभागाची सिस्टीम, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून याच आरोग्य विभागाला शासन कोट्यावधी रु.चा खर्च करत असताना डॉक्टरचा बेजबाबदारपणा, आरोग्य यंत्रणा यामुळे उपचाराच्या नावाखाली आदिवासींना जीव गमवावा लागत आहे. ही बाब संतापजनक आहे. यावर, कारवाईची मागणी मृतांचे नातेवाईक रामदास बरफ यांच्याकडून केली जात आहे. (वार्ताहर)