शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की

By admin | Updated: January 3, 2016 03:53 IST

३१ डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाईत नौपाडा आणि कापूरबावडी परिसरात दोघांनी अडथळा आणल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटनांत

ठाणे : ३१ डिसेंबरला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाईत नौपाडा आणि कापूरबावडी परिसरात दोघांनी अडथळा आणल्याचा प्रकार घडला. या दोन्ही घटनांत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.नितीन जंक्शन नाक्यावर वाहतूक उपविभाग वागळेचे पोलीस महेश महाले हे मध्यरात्री २ च्या सुमारास ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करीत होते. याचदरम्यान, वागळे इस्टेट येथे राहणारा अनिल यादव याची तपासणी केल्यावर त्याने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले. पण, पकडले जात असल्याचे लक्षात येताच या गोष्टीचा राग मनात धरून अनिलने मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ क रून धक्काबुक्की केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. दुसऱ्या घटनेत, कापूरबावडी वाहतूक शाखेजवळ तेथील पोलीस रंगनाथ सहाणे हे कारवाई करताना, वर्तकनगर परिसरातील अजिज शेख आणि स्वप्नील ठाकरे यांनी त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या शर्टाचा खिसा फाडून नेमप्लेट तोडली. हा प्रकारही मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर दोघांनाही अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)