शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणाविरोधात व्यापारी आक्रमक

By admin | Updated: January 7, 2016 00:46 IST

स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कल्याण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतली

कल्याण : स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कल्याण शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेने हाती घेतली आहे. याबाबत, विश्वासात न घेता अन्यायकारक नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बुधवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, भाजपाचे मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार हे व्यापाऱ्यांच्या मदतीला धावले. एकीकडे स्मार्ट सिटीची स्वपे्न दाखवायची आणि दुसरीकडे या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या कारवाईविरोधात भूमिका घ्यायची, असे भाजपाचे मंत्री-नेते यांनी सुरू केल्याने यातून पक्षाची दुटप्पी भूमिका समोर आल्याचे दिसले.या रस्ता रुंदीकरणात सध्या कल्याण बाजारपेठेतील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी या परिसरातील ४०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावर, व्यापाऱ्यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी चर्चा केली. पण, कोणताही मार्ग न निघाल्याने मंगळवारी त्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला. सायंकाळी बैठकीत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करून कदापिही स्मार्ट सिटी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली. तसेच सेनेची लुडबुड सहन करणार नाही असे सांगितले.व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मंगळवारी निषेध नोंदविला. पुन्हा बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. यानंतर, पालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनात बैठक पार पडली. या वेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह गृहनिर्माणमंत्री मेहता, प्रवीण दरेकर, खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, आमदार रवींद्र चव्हाण, उपमहापौर विक्रम तरे, राकेश मुथा आदी भाजपा नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त रवींद्रन हे मंत्रालयात कामानिमित्त गेल्याने त्यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी त्यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाची कारवाई चुकीची आहे. धमकाविले जात असून याआधी रुंदीकरणाची कारवाई केली आहे, तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याकडे व्यापाऱ्यांनी पुन्हा लक्ष वेधले. आयुक्त आणि व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडणे महत्त्वाचे असल्याचे म्हणणे व्यापाऱ्यांनी मांडले. यावर, आयुक्तांपर्यंत या भावना पोहोचवल्या जातील, असे आश्वासन घरत यांनी दिले.