शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याची पोलीस ठाण्यातच आत्महत्या

By admin | Updated: November 10, 2016 03:02 IST

येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या शुभम रामप्यारे जैस्वाल (२०) याने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

अंबरनाथ : येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या शुभम रामप्यारे जैस्वाल (२०) याने पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने पोलीस कोठडीतील शौचालयाच्या ग्रीलचा आधार घेऊन गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी सीआयडीच्या पथकामार्फत तपास सुरू केला आहे. अंबरनाथमधील सोनसाखळी चोरीकरिता जैस्वाल याला पोलिसांनी ३० आॅक्टांबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर, त्याला सोडून देण्यात आले. मात्र, पुन्हा चोरीकरिता ५ नोव्हेंबरला अटक केली. त्याला न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या चार दिवसांत अंबरनाथ पोलिसांनी त्याची चौकशी केली. जैस्वालचा सहकारी सचिन भगवान म्हस्के यालाही अटक केली होती. या दोघांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वी दोन तास अगोदर शुभम हा कोठडीतील शौचालयात गेला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाची पूर्वानुमती त्याने घेतली होती. मात्र, १० मिनिटे झाली तरी आरोपी बाहेर आला नाही, हे पाहिल्यावर पोलिसाने दरवाजा तोडला असता आरोपीने शौचालयाच्या वर असलेल्या लोखंडी गजाला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेने अंबरनाथ पोलीस चांगलेच धास्तावले आहेत. आरोपीने कोठडीत आत्महत्या केल्याने न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. आरोपीने आत्महत्या करण्यामागे घरगुती कारण असल्याचा दावा आता पोलीस करीत आहेत. मृताच्या नातेवाइकांनी मात्र अद्याप कोणतीही तक्रार न केल्याने या प्रकरणामागे नेमके काय कारण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)