शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २३० बसेसला नव्या वर्षाचा मुहूर्त

By admin | Updated: October 26, 2015 00:42 IST

परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला होता.

ठाणे : परिवहन सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या २३० पैकी १९० बसेससाठी कंत्राटी स्वरूपात वाहक घेण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला होता. त्याचा ठेकेदार मिळाला असून आता त्यांनी पुढील टप्प्यातील बोलणी सुरू केली आहे. परंतु, मुल्ला बाग आणि ओवळा येथील आगाराचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने दाखल होणाऱ्या या नव्या बसेस कुठे उभ्या करायच्या, असा सवाल सध्या परिवहनला सतावू लागला आहे. मात्र, येत्या डिसेंबरअखेर हे दोनही डेपो खुले केले जातील, असा दावा करून नव्या वर्षात सुरू करण्याची हमी महापौरांनी दिली आहे. ठाणे परिवहन सेवेत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २३० बसेस घेण्यात येत आहेत. त्यातील १५ व्होल्वो बस दाखल झाल्या असून उर्वरित १५ बसेस या मुल्लाबाग येथील आगाराचे काम पूर्ण झाल्यानंतर दाखल होणार आहेत. उर्वरित १९० बसेससाठीदेखील खाजगी ठेकेदार नेमण्याचे निश्चित झाले आहे. प्रति किमी रॉयल्टी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या या बसेसवर परिवहनची मालकी असणार असून ती संबंधित ठेकेदाराला आगार उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भात निविदा काढून तिला तीन वेळा मुदतवाढ देऊनही एकही ठेकेदार पुढे आला नव्हता. सोमवारी एक बैठकही पार पडली. परंतु, त्यांनी दिलेल्या दरावरून सध्या वाटाघाटी सुरू असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. असे असले तरी हाच ठेकेदार अंतिम केला जाणार असल्याचा दावा परिवहनने केला आहे. त्यानुसार, नव्याने दाखल होणाऱ्या बसला चालक मिळणार असले तरीदेखील घोडबंदर भागातील मुल्ला बाग आणि ओवळा डेपोचे काम रखडल्याने या बस कुठे उभ्या करायच्या, असा प्रश्न आहे. परिवहनमार्फत त्यासाठी घोडबंदर येथील ओवळा आणि मानपाडा येथील भूखंड ताब्यात घेतले आहेत.