तीस मित्रांनी घेतला विसर्जनाचा वसा

By Admin | Updated: September 9, 2016 02:29 IST2016-09-09T02:29:39+5:302016-09-09T02:29:39+5:30

विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या भग्न मूर्ती दुसऱ्याच दिवशी किनाऱ्यावर विदारक स्थितीत पहावयास मिळतात. कित्येक जण त्यावर टीका करतात.

Thirty friends took immersion fat | तीस मित्रांनी घेतला विसर्जनाचा वसा

तीस मित्रांनी घेतला विसर्जनाचा वसा

हितेन नाईक , पालघर
विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या भग्न मूर्ती दुसऱ्याच दिवशी किनाऱ्यावर विदारक स्थितीत पहावयास मिळतात. कित्येक जण त्यावर टीका करतात. आणि सरतेशेवटी कुणावर तरी खापर फोडले जाते.
मात्र, शिरगावच्या श्री गणेश मित्र मंडळातील (युवा मांगेलआळी) तीस मित्रांनी एकत्र येऊन विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना होडी व इतर सेवा विनामूल्य देण्याचा पण केला आहे.
गणपती बाप्पा भक्तांच्या घराघरांत स्थानापन्न होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पालघर जिल्ह्यात ३४ हजार ९८९ मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. समुद्रात विसर्जनानंतर ओहोटीच्या वेळी अवशेष किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पडल्याचे वेदनादायक चित्र प्रत्येक वर्षी पाहावयास मिळत होते.
बाप्पाची होणारी ही विटंबना रोखण्यासाठी शिरगावच्या श्री गणेश मित्र मंडळाच्या रितेश निजप, अमोल तांडेल, सुजित पागधरे, अक्षय किणी, राहुल किणी, चेतन धनू या तीस मित्रांनी दहादहा मुलांच्या तीन वेगवेगळया टीम बनवून आपल्याजवळील होड्यांद्वारे खोल समुद्रात गणेश विसर्जन केले.

Web Title: Thirty friends took immersion fat