Third Standred student beaten up by teacher | तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करुन मारहाण; ४५0 उठाबशांची शिक्षा, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा
तिसरीच्या विद्यार्थिनीस अर्धनग्न करुन मारहाण; ४५0 उठाबशांची शिक्षा, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा

मीरा रोड - मीरा रोड येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थिनीला अर्धनग्न करुन तिला मारहाण केल्याचा आणि पाय सुजेपर्यंत तिला तब्बल ४५0 उठाबशा काढायला लावल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी संबंधित खाजगी शिकवणीच्या शिक्षिकेविरुध्द नयानगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात  आला.

शांतीनगर येथील पीडित मुलीस तिचे पालक सेक्टर १०, सी - ६३ इमारतीमध्ये खाजगी शिकवणी घेणा-या लता नावाच्या महिलेकडे पाठवत होते. गेल्या महिन्यात लताने पीडित मुलीस होमवर्क केला नाही म्हणून तिची लेगिंग खाली खेचून पायावर आणि मांडीवर छडीने मारले होते. त्यामुळे तिच्या मांडीवर काळे, निळे व्रण उठले होते. त्यावेळी मुलीच्या आईने त्यांना शिक्षा न करण्यास सांगितले होते. मात्र, १७ जानेवारी रोजी मुलगी शिकवणीवरुन घरी परतली असता, तिने पाय दुखत असल्याचे आईला  सांगितले. तिला चालताना त्रास होत होता. चौकशी केली असता, लताने तिला अभ्यास केला नाही म्हणून ४५० उठाबशांची शिक्षा केल्याचे समजले. या शिक्षेमुळे तिच्या मांड्या आणि पोटºया सुजून चालण्यास त्रास होत होता.

शिक्षिकेवर गुन्हा दाखल
गेल्या महिन्यात मुलीला शिक्षिका लताने मारहाण केल्यानंतर तिच्या आईने शिक्षिकेची भेट घेतली. मुलीला मारू नका, कपडे उतरवण्याची शिक्षा देऊ नका, ती शिकेल तशी तिला शिकु द्या, असे आईने शिक्षिकेला सांगितले होते. तरीही शनिवारी मुलीला उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने आईने नयानगर पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title: Third Standred student beaten up by teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.