शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात छमछम होणार बंद

By admin | Updated: August 19, 2015 23:56 IST

ठाणे महापालिका क्षेत्रात आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अनधिकृत डान्स बार चालविणाऱ्यांच्या विरोधात पालिका आणि पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात आॅर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अनधिकृत डान्स बार चालविणाऱ्यांच्या विरोधात पालिका आणि पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असतानाच पालिकेने यासंदर्भात नवीन धोरणही जाहीर केले असून महापालिका हद्दीत असलेल्या कोणत्याही लेडिज बारला नव्याने ‘ना हरकत दाखला’ देता येणार नसल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. अनधिकृत बांधकामांत असलेल्या एकाही नव्या हॉटेल अथवा बारला अग्निशमन विभागाचा ना-हरकत परवाना देता येणार नसल्याचेही त्यांनी बुधवारच्या महासभेत जाहीर केले. त्यामुळे शहरात ८० टक्के अनधिकृत बांधकामांत सुरू असलेल्या बार, हॉटेलांवर आता संक्रांत ओढवली आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या ना हरकत दाखल्याचे नूतनीकरणही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील आॅर्केस्ट्रा व महिला सर्व्हिस बार आस्थापनांच्या मोकळ्या जागांमध्ये उजेड व वायुविजन नसल्याने त्या ठिकाणच्या मोकळ्या जागा अत्यंत धोकादायक असल्याने त्यातील मानवी वापर अतिशय असुरक्षित आहे. तसेच तेथे केलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत नगररचना आणि अग्निशमन यंत्रणेसंबंधीचे सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून अनेक बार रात्री दीड वाजेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी अशा काही बारवर धाडी टाकल्या असता त्या ठिकाणी भुयारी मार्गाचा वापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अशा ५५ बारची यादी पालिकेला दिली होती. त्यानंतर, पालिकेने बारवर कारवाई करण्यास सुरुवातही केली आहे. आतापर्यंत ३० हून अधिक बार जमीनदोस्त करण्यात आले आहेत.दरम्यान, आता यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका हद्दीतील खाद्यगृह नोंदणी अथवा सार्वजनिक करमणूक परवान्याकरिता अग्निशमन विभागामार्फत देणाऱ्या ना हरकत दाखल्याच्या कार्यपद्धतीबाबत नवीन धोरण निश्चित केले असून या धोरणाला बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देत असताना बेसमेंटमध्ये असलेल्या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी केली. तर, गार्डन स्वरूपात सुरू असलेल्या हॉटेल, मॉलमध्ये टेरेसवर सुरू असलेले हॉटेल यांचीही तपासणी करण्याची सूचना विक्रांत चव्हाण यांनी दिली. तसेच काही हॉटेल रस्त्यावर अथवा पालिकेच्या डीपी प्लॅनवरील जागेवर उभारण्यात आले आहेत. परंतु, त्यांच्यावर या धोरणानुसार कारवाई होणार का, असा सवाल हिरा पाटील यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)