शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

परीवहन सभापतींचा वॉर्ड असूनही बस नाही

By admin | Updated: September 24, 2015 00:02 IST

केडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी,

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रचंड दाटीवाटीची वस्ती, अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, आपत्कालीन स्थितीत भयंकर अडचणी, पुरेशा वाहतूक साधनांचा अभाव, मुलभूत सुविधांची वानवा, आरोग्याचा गंभीर प्रश्न अशा विविध प्रश्नांमुळे नागरिक हैराण आहेत. यापैकी बहुतांशी सुविधांचा अभाव येथील तुकारामनगर वॉर्डात दिसून येतो. पाणी, वीज, पायवाटा, गटारी आणि अंतर्गत रस्ते हे जरी नगरसेवकाने दिले असले तरीही ‘स्वास्थ’ अर्थात नागरिकांच्या आरोग्य याचा विचार मात्र झालेला दिसून येत नाही. करमणुकीसाठी एकही साधन नाही, की त्याचे भविष्यात नियोजन नाही. १० हजारांहून अधिकच्या वस्तीसाठी केवळ एकमेव वाचनालय आहे. मध्यमवर्गीय, तळागळातले नागरिक येथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या पाल्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव आहे. परंतु, केवळ चांगली जागा मिळत नसल्याने तो कागदावरच आहे. केडीएमटीच्या सभापतींचा वॉर्ड अशी त्याची ख्याती आहे. परंतु, असे असतांनाही सभापती त्यांच्या या वॉर्डात बस आणू शकले नाहीत. आगामी काळात ते ती सुविधा देणार आहेत. परंतु, कधी याबाबत मात्र निश्चिती नाही. तसेच बस सुरु झाल्यावर ती कायमस्वरुपी राहणार याबाबतही शाश्वती नाही. या वॉर्डाच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे, काँग्रेसचे आमदार संजय दत्त आदींनी भरपूर निधी दिला. परंतु, तो सर्व पायवाटा, गटारे यांच्यासाठीच वापरला गेला. त्या विशेष निधीतून वेगळे असे वॉर्डासाठी काही करण्यात नगरसेवक कमी पडल्याचे स्पष्ट होते. कचराकुंडी मुक्त वॉर्ड असला तरीही परिसरात खासगी मालमत्तांमुळे विकास करता येत नाही, त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मातीचे ढिगारे दिसून येतात. त्यामुळेही परिसराला बकाल अवस्था आली आहे. कुठेही सरळ रस्ते नाही, आडवळणाच्या पायवाटांना रस्त्याचे स्वरुप दिले असून एकावेळी अवघी एकच रिक्षा जाऊ शकते, दोन मोठी वाहने एकमेकांसमोर आल्यास पंचाईत होते. अंतर्गत, चिंचोळा वॉर्ड वाढलेला असतांनाही फेरीवाला समस्या असून फुटपाथ नावालाच आहेत. विरंगुळयाचे साधन नाही. एका शाळेसमोरील चौकाचे कधीकाळी थातुरमातूर सुशोभिकरण केले होते. हे सांगावे लागावे इतकी त्या चौकाची दुरवस्था झाली असून त्याला डागडुजीची गरज आहे. तेथे असलेले कारंजे तांत्रिक कारणाने बंद पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ५ वर्षांत केले काय? असा जनतेचा प्रश्न आहे.