शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासावरच सर्व जग अवलंबून, अविश्वासातून होते संशयाची निर्मिती- श्री श्री रविशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:47 IST

‘उल्हास उत्सव’ सोहळ्यातून अध्यात्मिक जागर

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: जीवनात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. विश्वासासाठी ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींवरही विश्वास ठेवावा लागतो. विश्वासावर सर्व जग अवलंबून असून, अविश्वास आल्यास संशय निर्माण होतो. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे आपल्या जीवनात कौशल्य, प्राविण्य येते. त्यातून कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकतो. यशामुळे साहजिकच जीवन अधिक सुंदर होते, अशा शब्दांत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक आणि प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला.

उल्हासनगरमधील गायकवाड पाडा येथे मंगळवारी सायंकाळी ‘उल्हास उत्सव’ या अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

श्री श्री रविशंकर यांची गुरुवाणी ऐकण्यासाठी परिसरातून जनसागर लोटला होता. तणावमुक्त जीवन, ध्यान, अध्यात्मिक शक्ती याबाबत विवेचन करताना त्यांनी विश्वास सर्वांत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मानवी जीवनात आनंद आणि शांतता मिळवण्यासाठी ध्यानाशिवाय पर्याय नाही, असा संदेश त्यांनी दिला.

आत्मविश्वास तीन प्रकारचा आहे. दुसऱ्यावर विश्वास ठेवल्याने जीवनाला गती मिळते. योग करण्यासाठी मन शुद्ध असणे गरजेचे आहे. भारतीय म्हणून आपण सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाविकांनी विचारलेल्या प्रश्नांचे श्री श्री रविशंकर यांनी निरसन केले. श्री श्री रविशंकर यांच्या गुरुवाणीने भक्त मंत्रमुग्ध झाले होते. सर्व वातावरण अध्यात्मिक झाले होते.

सिंधी समाजाच्या डीएनएमध्ये व्यापार

फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला जन्मभूमी सोडावी लागली. मात्र, आज सिंधी समाज जगभर सामावला आहे. सिंधी समाजाच्या डीएनएमध्ये व्यवसाय आहे. 
नोकरी करणारा सिंधी माणूस असू शकत नाही, असे साधारणपणे म्हटले जाते. दक्षिण भारतातील माणूस नोकरीत रमतो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मोठे मन

महाराष्ट्राचा माणूस प्रांतवाद सोडून देशवासी बनलेला आहे. महाराष्ट्राचे मन मोठे आहे. विठ्ठलावर सर्व महाराष्ट्राची श्रद्धा आहे. पंढरपूरचा विठोबा सर्व भारताचे दैवत आहे, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Trust sustains the world; distrust breeds doubt: Sri Sri Ravi Shankar.

Web Summary : Sri Sri Ravi Shankar emphasized trust's importance, linking it to knowledge and science. He highlighted yoga, meditation, and pranayama for skill development and success. He praised Maharashtra's inclusivity and the widespread devotion to Lord Vithoba.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर