शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 06:54 IST

मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

ठाणे : राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) महामंडळाचा चेहरामाेहरा बदलून अगदी फाइव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले. खाेपट बसस्थानकातील चालक, वाहकांच्या वातानुकूलित  विश्रांतिगृहाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. असेच विश्रांतिगृहाचे राेल माॅडेल राज्यभर राबविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम केले पाहिजे. प्रवाशांना एअरपोर्टसारखे बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खासगी, सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. तसेच मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.  

कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्पपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यभरात सार्वजनिक, खासगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा  संकल्प असून, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसादिनी या योजनेचा  प्रारंभ करीत असल्याचेही ते म्हणाले. भविष्यात या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह विविध वैद्यकीय सेवासुविधा एसटीच्या  कर्मचाऱ्यांना माेफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्यांनाही मिळणार आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस.टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकstate transportएसटी