शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

ठाणेकरांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:26 IST

शंभर कोटींचा निधी : रस्त्यांच्या बाजूला करणार सुशोभीकरण

ठाणे : महापालिका अर्थसंकल्पात नव्या काही योजना मिळाल्या नसल्या, तरी आयुक्तांनी ठाणेकरांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी पुन्हा विशेष प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यासाठी १०० कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. यामुळे ठाणेकरांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढणार की कमी होणार, हे आता काळच ठरवणार आहे.

आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा हॅप्पीनेस इंडेक्सचा विचार केला आहे. त्यानुसार, याद्वारे विविध योजना त्यांनी प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये ग्रीन कॅनॉपीच्या माध्यमातून घोडबंदर आणि पोखरण रोडच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर हिरवळ निर्माण करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहरातील विविध उद्यानांमध्ये छोटे प्लॉट्स आॅरगॅनिक शेतीसाठी उद्यान दत्तक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १.५० कोटी, विद्यार्थी वृक्ष दत्तक उपक्रमांतर्गत विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक तत्त्वावर देण्याचे प्रस्तावित असून यासाठी एक कोटी, मिस्ट स्प्रेअंतर्गत धूळप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याची एक कोटी खर्चून तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, वाघबीळ या चौकात उभारणी करण्यात येणार आहे. मुलांसाठी कला उपक्रम राबवण्यासाठी एक कोटी, फिरते ग्रंथालय ही आधुनिक संकल्पना राबवली जाणार असून यासाठी एक कोटी, आरोग्य नायक योजनेच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून दोनदा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य प्रगती मोजली जाणार असून यासाठी एक कोटी, उच्च शिक्षण प्रवेश सहायता केंद्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी, ध्वनिरोधक भिंत ही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उभारली जाणार असून यासाठी एक कोटी, डिजिटल मेसेज बोर्डसाठी दोन कोटी, नवजात शिशूंसाठी दूध बँक योजना पुढे आली असून या माध्यमातून एक संपूर्ण मानवी दूधपेढी उभारली जाणार आहे, त्यासाठी एक कोटी प्रस्तावित केले आहेत. डिजिटल साक्षरता उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना स्मार्टफोन वापर आणि इंटरनेट साक्षरतेचे धडे दिले जाणार असून यासाठी दोन कोटी प्रस्तावित केले आहेत.एक दिवस आयुक्तांसोबत घालवाएक दिवस आयुक्तांसमवेत या योजनेंतर्गत शहरातील महाविद्यालयीन तरुण व तरुणींना महापालिका प्रशासन कसे काम करते, हा अनुभव घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून यासाठी २० लाखांची तरतूद केली आहे. ‘डिजी लॉकर’अंतर्गत विविध प्रमाणपत्रे जतन करण्यासाठी एक गिगाबाइटच्या मर्यादेत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी २० लाख,तर लिव्हिंग लॅबद्वारे नागरी विषयांत उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत. यासाठी दोन कोटी, रंगीत झेब्रा क्रॉसिंगसाठी ५० लाख, कौशल्य विकाससाठी पाच कोटी, अ‍ॅडाप्टिव्ह ट्रॅफिक सिस्टीम या यंत्रणेसाठी आठ कोटी निधी प्रस्तावित केला आहे.वैद्यकीय सुविधांवर भर : वैद्यकीय चिकित्सा केंद्रासाठी दोन कोटी, शाळा व पालक संवादासाठी १.५० कोटी, अंधांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमासाठी दोन कोटी, नवजात शिशू उपचार केंद्रासाठी चार कोटी, मोहल्ला क्लिनिक विकसित करण्यासाठी २० कोटी, औषधी भांडारअंतर्गत नाममात्र दरात औषधे मिळणार असून यासाठी चार कोटी, रक्त कर्करोग उपचारासाठी पाच कोटी, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुविधांसाठी दोन कोटी प्रस्तावित केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका