शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

ठाणेकरांची दिवाळी सामाजिक भानाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 1:28 AM

ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दीपावलीपूर्व व दीपावली काळात हवा, ध्वनी यांची गुणवत्ता तपासली जाते. दिवाळीचे आठ दिवस आधी हवेतील धूलिकणांचे प्रमाण १२६ मायक्रोग्राम होते.

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे यंदा सर्वच सण-उत्सव साजरे करताना नागरिकांनी सामाजिक भान जपलेले आहे. दिवाळीदरम्यानही ठाणेकरांनी यंदा हे सामाजिक भान राखलेले दिसले. यंदा ठाण्यात दिवाळीच्या चार दिवसांत झालेल्या हवा आणि ध्वनिप्रदूषणात गेल्या दोन वर्षींच्या तुलनेत काही प्रमाणात घट झालेली आढळली. गेल्या दोन वर्षांची तुलना करता धूलिकणांचे प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत कमी आढळले, ध्वनी पातळीत २१ ते २९ टक्के इतकी घट झालेली दिसली. तर हवेच्या गुणवत्तेतही ३७ टक्के इतकी सुधारणा झाली.ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दीपावलीपूर्व व दीपावली काळात हवा, ध्वनी यांची गुणवत्ता तपासली जाते. दिवाळीचे आठ दिवस आधी हवेतील धूलिकणांचे प्रमाण १२६ मायक्रोग्राम होते. दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी ते १३३ मायक्रोग्राम होते. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ते ४४ टक्क्यांपर्यंत कमी आढळले. ध्वनीची तीव्रता ही दिवाळीपूर्वी ६९ डेसिबल होती ती लक्ष्मीपूजनादरम्यान ७२ डेसिबल इतकी आढळली. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ध्वनिपातळीतही सुमारे २९ टक्के घट झाली तर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. यंदा एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साजरे करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेद्वारे दीपावलीसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्याआधारे आणि एकूणच परिस्थितीचे भान राखत ठाणोकरांनी फटाके कमी फोडले. तसेच यंदा दिवाळीनिमित्त पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या घरी जाण्याचे टाळून घरच्याघरीच दिवाळीचा सण साजरा केला.नियम मोडणाऱ्या ४६ जणांवर मीरा-भाईंदरमध्ये गुन्हे दाखलमीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके फोडण्यास परवानगी असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. फटाके फोडणाऱ्यां विरुद्ध शहरातील सहा पोलीस ठाण्यात ४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात ६४ आरोपी आहेत. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ही बाब गांभीर्याने घेत मीरा- भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना कारवाईचे निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या अखत्यारितील भाईंदर पोलीस ठाण्यात सर्वाधिक ३० आरोपींविरुद्ध २० गुन्हे दाखल झाले आहेत . तर नवघर पोलीस ठाण्यात ११ आरोपी विरुद्ध ९ गुन्हे, मीरा रोड १० आरोपींविरुध्द ६ गुन्हे, काशिमीरा पोलीस ठाण्यात ५ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे, नयानगर पोलीस ठाण्यात ७ आरोपीं विरोधात ७ गुन्हे, उत्तन सागरी पोलीस ठाण्यात १ गुन्हा असे ४६ गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणे