शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या अडीच हजार चालकांविरुद्ध ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:56 IST

गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरासह ठाणे जिल्हयातही कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल अडीच हजार वाहनांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या चार दिवसात कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोहीम१२ लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरासह ठाणे जिल्हयातही कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल अडीच हजार वाहनांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या चार दिवसात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचा दंड आकारल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. वारंवार आवाहन करुनही वाहन चालकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन मोठया प्रमाणात वाढले आहे. रिक्षातूनही दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. तरीही शेअर रिक्षाच्या नावाखाली चार ते पाच प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जाते. अनेक खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहन चालकांकडूनही नियमांचे उल्लंघन होत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार १९ ते २२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत रिक्षा, मोटारसायकल, मोटारकार आणि अवजड वाहने अशा दोन हजार ५२७ वाहनांवर वाहतूक विभागाच्या १८ पथकांनी कारवाई केली. या चालकांकडून सुमारे १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमध्ये सर्वाधिक एक हजार ९६९ रिक्षांवर त्यापाठोपाठ १७८ मोटारसायकल, १६५ मोटारकार आणि २१५ अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.* याशिवाय, कर्णकर्कश आवाज करीत वाहने हाकणाºया चालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गेल्या चार दिवसात अशा ७९ वाहनांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांसह कोविड १९ च्या नियमांचा भंंग केल्यास अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे. जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध साथ प्रतिबंध कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. ’’बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस