शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलासह मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 23:20 IST

राजस्थानातून अपहरण झालेल्या मुलीसह अल्पवयीन मुलगाही ठाण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने त्यांना ठाण्याच्या सिडको बस थांबा येथून ताब्यात घेतले. आता या दोघांनाही राजस्थान येथील त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरीराजस्थान पोलिसांच्या दिले ताब्यातपोलीस आयुक्तांनी केले कौतुक

ठाणे : राजस्थानमधून अपहरण झालेल्या एका सोळावर्षीय मुलीचा आणि अठरा वर्षीय मुलाचा ठाणे पोलिसांनी शोध घेतला असून, त्यांना त्यांच्या पालकांकडे गुरुवारी सोपवण्यात आले. गेल्या चार दिवसांमध्ये अशा तीन मुलांचा शोध घेण्यात यश आल्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील कोटा शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बोरखेडा येथील पोलीस ठाण्यात आदित्य शंकरलाल मिणा (१८) आणि एका सोळावर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा २०१८ मध्ये दाखल करण्यात आला होता. ही मुले ठाण्यात असल्याची माहिती राजस्थान पोलिसांकडून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यासाठी राजस्थान येथील पोलीस उपनिरीक्षक चंपालाल जांगीड हे त्यांच्या पथकासह ठाण्यात दाखल झाले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, चंद्रकांत वाळुंज, नीलम पाचपुते आणि वसंत शेडगे आदींचे पथक राजस्थान पोलिसांसमवेत मदतीसाठी नेमण्यात आले. ही दोन्ही मुले ठाण्याच्या सिडको बसथांब्यावर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांना १८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. हे दोघेही राजस्थानातील बोरखेडा बजरंग विहार येथून बेपत्ता झाल्याचे चौकशीत समोर आले. गेल्या १५ महिन्यांपासून ते ठाणे आणि मुंबई परिसरांत वास्तव्य करीत होते. त्यांना इकडे कोणी आणले, त्यासाठी कोणी फूस लावली, या सर्व बाबींचा आता राजस्थान पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या दोघांनाही राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका सोळावर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याण येथून शोध घेतला होता.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण