Thane Murder: कामाच्या बहाण्यानं इमारतीत नेलं आणि...; कळव्यात महिलेची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:55 IST2025-06-16T12:52:51+5:302025-06-16T12:55:06+5:30

Thane Kalwa Murder: ठाण्यातील कळवा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली.

Thane: Kalwa Woman Brutally Murdered At Construction Site | Thane Murder: कामाच्या बहाण्यानं इमारतीत नेलं आणि...; कळव्यात महिलेची निर्घृण हत्या

Thane Murder: कामाच्या बहाण्यानं इमारतीत नेलं आणि...; कळव्यात महिलेची निर्घृण हत्या

कळवा येथील कावेरी सेतू परिसरातील 'सीमा हाईट्स' इमारतीमधील शांती सुरेश चव्हाण (४०) या महिला कामगाराची तीक्ष्ण हत्याराने वार करून ओढणीने गळा आवळून हत्या झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे कळवा पोलिसांनी रविवारी सांगितले. लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने हत्या केली की लुटमारीसाठी? याचा शोध पोलिस घेत आहेत.

शांती चव्हाण ही नाका कामगार असून, इमारत बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीने बिगारी काम करत होती. कळवा येथील सम्राट अशोकनगर झोपडपट्टीत ती राहत होती. १४ जून रोजी दुपारी एक कामगार सीमा हाईट्समध्ये शिडी आणण्यासाठी गेला. त्यावेळी तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. सकाळी ९:३० ते १०च्या दरम्यान तिची हत्या केल्याची बाब समोर आली आहे.

लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न की लुटमारीतून घटना?
कळवा नाक्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास इतर कामगारांसमवेत बिगारी कामासाठी ती आली होती. त्यावेळी तिला काही नागरिकांनी या इमारतीत सफाई कामाच्या बहाण्याने नेले. त्याच ठिकाणी तासाभराने हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सांगितले. तिच्या एका कानातील कुडी गायब असल्याने लुटमारीसाठी हत्या झाली का? कामाच्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर तिने प्रतिकार केल्याने तिच्यावर हल्ला झाला का? अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचेही अशोक उतेकर यांनी सांगितले.

Web Title: Thane: Kalwa Woman Brutally Murdered At Construction Site