शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रुग्णालय प्रशासन ‘त्या’ डॉक्टरांच्या पाठिशी

By admin | Updated: June 24, 2016 03:38 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी अचानक रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, विविध विभागातील तब्बल २३ डॉक्टर कामाच्या

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात अतिरिक्त आयुक्तांनी मंगळवारी अचानक रुग्णालयाची झाडाझडती घेतली असता, विविध विभागातील तब्बल २३ डॉक्टर कामाच्या वेळेत हजर नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास होती. त्यानंतर या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, आता रुग्णालय प्रशासन या कामचुकार डॉक्टरांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी या कारवाईवरच आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे हे डॉक्टर अद्यापही थम्ब मशिनला संलग्न नसल्याची भूमिका पालिका प्रशासने घेतली असून रुग्णालय प्रशासनाने मात्र या डॉक्टरांची रोज थम्ब मशिनद्वारे हजेरी घेतली जात असल्याचा दावा केला आहे. पालिका आणि रुग्णालय प्रशासनात आता या मुद्यावरुन सावळोगोंधळा निर्माण तर झाला आहेच, परंतु, गलेलठ्ठ पगार घेऊन गैरहजर राहणाऱ्या या डॉक्टरांमुळे रुग्णालयात दूरवरुन येणाऱ्या शेकडो रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे आता आयुक्त याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात जिल्ह्याच्या विविध भागातून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२०० च्या घरात आहे. तर आंतर रुग्णांची संख्या, ३०० च्या आसपास आहे.
रुग्णालय आणि रुग्णालय प्रशासनाची लक्तरे यापूर्वीदेखील वेशीला टांगली गेली आहेत. महासभा अथवा स्थायी समितीची सभा दोनही ठिकाणी सदस्यांनी कळवा रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीच्या बैठकीत तर कळवा रुग्णालयाच्या कारभारावरील चर्चेत या रुग्णालयातच स्थायीची बैठक घ्या, अशी मागणीच काही सदस्यांनी केली होती. असे असतांनाहीदेखील रुग्णालय प्रशासन आजही यातून काही बोध घेतांना दिसत नाही. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत म्हणून डॉक्टरांची फळी उभारण्यात आली आहे. परंतु असे असतांनाही देखील तज्ज्ञ डॉक्टरांऐवजी प्रशिक्षिणार्थी डॉक्टरांकडूनच रुग्णावर उपचार केले जात असल्याची माहिती आता या निमित्ताने समोर आली आहे.