शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर खाजगी एजन्सीच्या हातात ठाणेकरांचे आरोग्य; पालिकेचे वैद्यकीय अधिकारीही हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 20:22 IST

CoronaVirus News : कोविडचा सामना करण्यासाठी बाळकूम येथे कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली. यासाठी वॉररूमची निर्मिती देखील करण्यात आली आहे. ज्यांना या हॉस्पिटलला दाखल व्हायचे असेल त्यांना या वॉररूमच्या माध्यमातून लॉगिन करावे लागते.

ठाणे : कोरोनाचा  सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने वॉररूमच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एका खाजगी एजन्सीला दिली असली तरी या एजन्सीच्या मुजोर डॉक्टरांमुळेच आता ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले, असल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी झालेल्या महासभेत उघड केला आहे.

पालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी वॉररूमध्ये लॉगिन करूनही ज्या एजन्सीला मान्यता देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच डॉक्टरांकडून ड्राइव्हिंग करत असल्यानेच काहीच करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले तर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर यांनी तर हे काम एजन्सीला देण्यात आले असल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले असल्याची माहिती रेपाळे यांनी दिल्यानंतर महापौरांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.             

कोविडचा सामना करण्यासाठी बाळकूम येथे कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली. यासाठी वॉररूमची निर्मिती देखील करण्यात आली आहे. ज्यांना या हॉस्पिटलला दाखल व्हायचे असेल त्यांना या वॉररूमच्या माध्यमातून लॉगिन करावे लागते. मात्र एका खाजागी एका खाजागी एजन्सीला काम देऊन ठाणे महापालिकेने ठाणेकरांचे आरोग्य कसे धोक्यात आणले आहे, याचे उदाहरणच नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनासमोर दिले. 

एका रुग्णाने हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यासाठी वॉर रूमला लॉगिन केले मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रेपाळे यांनी संबंधित एजन्सीच्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर त्यांनी थेट मी ड्रायविंग करत असल्याने मी आता मान्यता कशी देऊ असे उद्धट उत्तर दिले. जर संबंधित डॉक्टर्स तीन तास ड्रायव्हिंग करत असते आणि या काळात या  रुग्णाला काही झाले असते तर जबाबदारी कोणी घेतली असती असा प्रश्न विकास रेपाळे यांनी उपस्थित केला. हद्द  म्हणजे  वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी तर एजन्सीला आम्ही काम दिल्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले असल्याचे रेपाळे यांनी सांगितले. त्यामुळे रेपाळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.  

महापौरांनी केली कानउघडणी
आरोग्य यंत्रणा सांभाळण्याचे काम ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे असून आरोग्य यंत्राना कशी फोल झाली आहे हे सांगण्याचे नाही अशा शब्दात महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाची चांगलीच कामउघडणी केली. एजन्सीवर तुम्ही कशाला अवलंबून राहता , यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. 
 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस