Thane Crime: पत्नीच्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर अश्लील कमेंट; जाब विचारणाऱ्या पतीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 10:49 IST2026-02-28T10:47:07+5:302026-02-28T10:49:51+5:30
नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे आफताब शेख हे पत्नी शबाना शेख (२२) यांच्यासोबत राहत होते.

Thane Crime: पत्नीच्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर अश्लील कमेंट; जाब विचारणाऱ्या पतीची हत्या
नालासोपारा : बायकोच्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर अश्लील कॉमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या पतीच्या हत्येची घटना शुक्रवारी सकाळी नालासोपारा पश्चिमेच्या हनुमाननगर येथे घडली. आफताब शेख (२४) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथे आफताब शेख हे पत्नी शबाना शेख (२२) यांच्यासोबत राहत होते. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे शबाना यांनी स्टेटस ठेवले होते.
ते पाहून मेहंदी हसन शेख (२२) याने कॉमेंट केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी शबाना आणि तिचा पती आफताब हनुमाननगर येथील मेहंदी हसनच्या घरी गेले होते.
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी मेहंदी हसन शेख सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याला पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली होती. आरोपी व मृत हे पूर्वी शेजारी राहत होते. अशी, माहिती वरिष्ठ निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली.