शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तांदूळ खरेदीच्या बहाण्याने १३ कोटींचा गंडा

By admin | Updated: March 27, 2017 04:11 IST

कोट्यवधीचा रुपयांचा तांदूळ आपल्या साथीदारांकडून खरेदी करण्यास तांदूळ व्यापारी रवींद्रनाथ मुजमदार यांना भाग पाडून

ठाणे : कोट्यवधीचा रुपयांचा तांदूळ आपल्या साथीदारांकडून खरेदी करण्यास तांदूळ  व्यापारी रवींद्रनाथ मुजमदार यांना भाग पाडून त्यांची डिलिव्हरी न करताच १३ कोटी ८१ हजार ६४५ रुपयांचा अपहार करणाऱ्या दिनेश दत्ताराम पाटील, रोहित शर्मा आणि मनोज गोसावी या तिघांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दिनेश हे मुलुंडच्या अश्विनी इंटरनॅशनल इपॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. ही ओळख लपवून ते मुजूमदार यांच्याकडे ३ फेबु्रवारी २०१७ रोजी कार्यालयीन सहाय्यक म्हणून कामाला लागले. त्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी ठेवू लागले. त्यानंतर मुजूमदार यांचा विश्वास संपादन करून रोहित शर्मा, मनोज गोसावी या आपल्या साथीदारांची तांदूळ विक्रेते म्हणून मुजूमदार यांना ओळख करून दिली. आपल्या या साथीदारांकडून कमी किमतीत तांदूळ खरेदी करून देण्यासाठी मध्यस्थीदेखील केली. त्यानुसार मुजूमदार यांनी दिनेशच्या मित्रांना १३ कोटी ८१ हजार ६४५ रुपयांच्या तांदूळाची आॅर्डर दिली. दिलेल्या आॅर्डरसाठी ठरल्याप्रमाणे त्यांनी सदर रकमेचा चेक अश्विनी इंटरनॅशनल इपॅक्स प्रा. लि. च्या बँक खात्यात जमा केला. हा चेक वळता करण्यात आला. मात्र, पैसे दिल्यानंतर एक महिना उलटूनही तांदूळ किंवा पैसे परत न मिळाल्याचा मुजूमदार यांचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांनी २५ मार्च रोजी दिनेश पाटीलसह त्याच्या साथीदारांविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)