ठाण्याचे आयुक्त झाले भावुक

By Admin | Updated: October 24, 2016 02:13 IST2016-10-24T02:13:28+5:302016-10-24T02:13:28+5:30

ठाणे शहराने गेले २२ दिवस राबविलेल्या स्वच्छता मोहीमेचे कौतुक करताना आयुक्त संजीव जयस्वाल कमालीचे भावूक झाले.

Thane Commissioner became emotional | ठाण्याचे आयुक्त झाले भावुक

ठाण्याचे आयुक्त झाले भावुक

ठाणे : ठाणे शहराने गेले २२ दिवस राबविलेल्या स्वच्छता मोहीमेचे कौतुक करताना आयुक्त संजीव जयस्वाल कमालीचे भावूक झाले. माझी बदली झाल्यावर हा दिवस आणि ठाणेकरांनी दिलेले भरभरुन प्रेम माझ्या लक्षात राहील, असे भावोद््गार त्यांनी काढले. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमची बदली होणार नाही. अजून बरेच काम करायचे आहे, असे सांगितल्याने पालिका वर्तुळात आयुक्तांच्या बदलीची चर्चा रंगली.
सर्वच घटकांतील ठाणेकर या अभियानात सहभागी झाले. हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आय लव्ह यू ठाणे. बदली झाल्यावर हा दिवस आणि ठाणेकरांनी दिलेले भरभरुन प्रेम माझ्या लक्षात राहील. माझे ठाणे, सुंदर ठाणे... अशा भावना जयस्वाल यांनी व्यक्त केल्या. त्यावर शिंदे म्हणाले, तुम्हाला अजून बरेच काम करायचे आहे. हे अभियान म्हणजे जयस्वाल यांचा मास्टरस्ट्रोक आहे. याला सर्वांचेच अनुमोदन आहे. यापूर्वीचे आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्यापेक्षाही दहा पावले पुढे जाऊन ठाण्याच्या विकासासाठी जयस्वाल यांनी चांगली कामगिरी केल्याचे शिंदे म्हणाले. त्याबाबत नंतर पत्रकारांनी विचारले असता जयस्वाल भावूक झाले. हे अभियान कारकिर्दीतील अविस्मरणीय कामगिरी आहे.

Web Title: Thane Commissioner became emotional