शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट, शाखाप्रमुखांसह शिवसैनिकांच्या घेतल्या गाठी भेटी

By जितेंद्र कालेकर | Updated: May 19, 2024 20:06 IST

Thane News: मुंब्य्रतील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी शहर प्रमुख मोबीन सुर्वे यांच्यासह शिवसैनिकांशी संवाद साधला. मतदार सूज्ञ असून ते विकासाला मतदान करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

- जितेंद्र कालेकर ठाणे - मुंब्य्रतील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी शहर प्रमुख मोबीन सुर्वे यांच्यासह शिवसैनिकांशी संवाद साधला. मतदार सूज्ञ असून ते विकासाला मतदान करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कळवा मुंब्रा मतदारसंघातून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवर ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मुंब्य्रातील या शंकर मंदिर परिसरातील शाखेवर राडा झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे या शाखेला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनीही भेट दिली हाेती. परंतू रविवारी (१९ मे रोजी) पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादग्रस्त शाखेला भेट दिली. समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही काम केलं आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक आपल्या सोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

या दरम्यान त्यांनी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विजय गोरे, शहर प्रमुख मोबीन सुर्मे, माजी नगरसेवक राजन किणे आणि शिवसैनिकांची भेट घेत चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तसेच कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार, महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातच कळवा मुंब्रा हा विधानसभा मतदारसंघ येताे. अवघ्या काही तासांवर मतदानाच्या प्रक्रीया आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहता कामा नये, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. मतदान लोकशाहीचा पवित्र अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मतदान लोकशाहीचा हा पवित्र अधिकार आहे. त्यामुळे सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सर्वांना विकास हवा आहे आणि विकास करणारे आमचे सरकार आहे. आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. टोरेंट विद्युत कंपनी बाबत अनेक तक्रारी कळाल्या आहेत. आमचे सरकार सामान्य नागरिकांसोबत आहे. निवडणुका होताच टोरंट बाबत बैठक घेऊन लोकांच्या हिताचा निर्णय घेऊ, असंही शिंदे यांनी सांगितले. कल्याण लोकसभेत समावेश असलेला मुंब्रा एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिदेंसाठीही हा मतदारसंघ तितकाच महत्वाचा आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सोमवारी पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेले मतदारसंघ मानले जातात. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील शिंदे यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४thaneठाणेkalyan-pcकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४