Join us
Daily Top 2Weekly Top 5

शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम

जोडी जमली, दोघांचीही शतके हुकली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 21:40 IST

Open in App

IPL 2026 Priyansh Arya And Cooper Connolly Records Broken Partnership  : न्यू चंडीगड येथील मुल्लनपूरच्या मैदानात पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्य आणि मध्यफळीतील फलंदाज कूपर कॉनॉली यांचा सुपर हिट शो पाहायला मिळाला. लखनौ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात या दोघांचेही शतक हुकले. पण दुसऱ्या विकेटसाठी १८२ धावांची भागीदारी रचत या जोडीनं एका डावात अनेक विक्रम मोडीत काढले. पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रभसिमरन सिंगच्या रुपात पंजाबच्या संघाला अवघ्या ३ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर प्रियांश आणि कूपर कॉनॉलीनं LSG च्या गोलंदाजांचे खांदे पाडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!एका षटकात LSG गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम

प्रियांश आणि कूपरने एडन मार्करमच्या गोलंदाजीवर पाच षटकार ठोकले आणि त्या षटकात ३२ धावा काढल्या. आयपीएलमध्ये एलएसजीच्या गोलंदाजाने दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी

  • ३२ – एडन मार्कराम विरुद्ध पीबीकेएस, मुल्लानपूर,  
  • २७ – रवी बिश्नोई विरुद्ध RCB, कोलकाता, २०२२ 
  • २६ - आवेश खान विरुद्ध पीबीकेएस, धर्मशाला, २०२५
  • २६ – रवी बिश्नोई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, लखनौ, २०२५
  • २५ – जेसन होल्डर विरुद्ध केकेआर, पुणे   

IPL मध्ये PBKS साठी दुसऱ्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी 

  • २००६ – ॲडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्श विरुद्ध आरसीबी, धर्मशाला, २०११
  • १८२ – प्रियांश आर्य आणि कॅमरुनन कॉनॉली विरुद्ध एलएसजी, मुल्लानपूर, २०२६ 
  • १३३ - शॉन मार्श आणि ल्यूक पॉमर्सबॅच वि मुंबई इंडियन्स, मुंबई (वानखेडे), २००८
  • १२५ – हाशिम आमला आणि शॉन मार्श विरुद्ध गुजरात लायन्स, मोहाली, २०१७
  • १२० – ख्रिस गेल आणि केएल राहुल विरुद्ध आरआर, अबू धाबी, २०२० 

टी२० मध्ये कूपर कॉनॉलीच्या सर्वोच्च वैयक्तिक धावा 

  • ८७ (पीबीकेएस) विरुद्ध एलएसजी, मुल्लानपूर, २०२६ 
  • ७७ (पर्थ स्कॉचर्स) विरुद्ध ब्रिस्बेन हीट, ब्रिस्बेन, २०२५
  • ७२* (पीबीकेएस) विरुद्ध जीटी, मुल्लानपूर, २०२६ 
  • आयपीएलमध्ये एलएसजी विरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी 
  • १८२ – प्रियांश आर्य आणि कूपर कॉनॉली (PBSK), मुल्लानपूर, २०२६ (दुसरी विकेट) 
  • १६७* – अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड (SRH), हैदराबाद, २०२४ (पहिली विकेट)
  • १४२ – वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल (GT), अहमदाबाद, २०२३ (पहिली विकेट)
  • १२१* – ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसन (RR), लखनौ, २०२४ (चौथी विकेट)
  • १२०* – श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्ट (KKR), कोलकाता, २०२४ (तिसरी विकेट) 

आयपीएलच्या एका डावात पंजाबच्या पहिल्या ३ फलंदाजांनी केलेले सर्वाधिक षटकार 

  • १६ विरुद्ध केकेआर, कोलकाता, २०२४
  • १६ विरुद्ध एलएसजी, मुल्लानपूर, २०२६, आज रात्री*
  • १५ विरुद्ध आरसीबी, धरमशाला, २०११
English
हिंदी सारांश
Web Title : Priyansh-Cooper's explosive partnership sets records in IPL 2026!

Web Summary : Priyansh Arya and Cooper Connolly's stunning 182-run partnership for Punjab Kings against Lucknow Super Giants shattered records. Despite missing centuries, their explosive hitting, including a 32-run over, highlighted their dominance, setting new benchmarks for PBKS and IPL partnerships.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्स