शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल,मालवाहू वाहनांना दिवसभर राहणार बंदी  

By जितेंद्र कालेकर | Updated: October 1, 2024 20:13 IST

Thane Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे.

ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे. ठाण्यातील रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी दिली.

ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग आहे. या मार्गांवरून गुजरातकडे आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसेच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई, जेएनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात माल वाहतूक केली जाते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घोडबंदर येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठया मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

गुजरातकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने मनोर टोल नाका येथून विक्रमगड-पाली-वाडा-आबिटघर-आटगांव-शहापूर-मुरबाड-कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे वळविली आहेत. तर नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने शहापूर-मुरबाड-कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे वळविली आहेत. मुंबईकडून येणारी मोठी वाहने ऐरोली टोलनाका मार्गे कर्जत-मुरबाड-शहापूर-वाडा-मनोर टोलनाका मार्गे पाठविली जाणार आहेत. ही वाहने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने पश्चिम द्रृतगती मार्गाने जातील.नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी मोठी मालवाहू वाहने कर्जत- मुरबाड-शहापूर मार्गे नाशिककडे तर आटगांव-आबिटघर-वाडा-पाली-विक्रमगड-मनोर टोल नाका- गुजरात मार्गे सोडली जाणार आहेत. ठाणे आयुक्तालयातील सर्वच मार्गांवरुन ५ ऑक्टाेंबर रोजी पहाटे १ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा बदल राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNarendra Modiनरेंद्र मोदी